21 April 2025 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, लीलावती इस्पितळात दाखल

Minister for state Abdul Sattar, Lilavati hospital, corona virus

मुंबई, २३ जुलै : मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सहा हजारांची दैनंदिन रुग्ण वाढीने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात बुधवारी १० हजार ५७६ रुग्णांची नोंद झाली, तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत.

याचबरोबर राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहचली आहे. यामध्ये आतापर्यंत करोनामुक्त झालेले १ लाख ८७ हजार ७६९ जण व करोनामुळे मृत्यू झालेल्या १२ हजार ५५६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांसोबत राजकारणी देखील मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आपण घरातच उपचार घेत असल्याचे सांगितले होते. मात्र आता त्रास जाणवू लागल्यामुळे अधिक उपचारासाठी लीलावतीमध्ये दाखल झाल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे की, माझी प्रकृती चांगली आहे. थोडा त्रास जाणवत होता म्हणून लीलावती रूग्णालय मुंबई येथे दाखल झालो आहे, चिंता नसावी.

 

News English Summary: Minister of State for Revenue Abdul Sattar has contracted corona and has been admitted to Lilavati Hospital for treatment. He gave this information through Twitter. Is. A few days ago, he told me that he had contracted corona and was being treated at home.

News English Title: Minister for state Abdul Sattar admitted to Lilavati hospital for corona virus News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या