22 January 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही | पण गृहमंत्री पदी अनिल देशमुख हेच राहतील

Jayant Patil, Anil Deshmukh, Sachin Vaze

मुंबई, १५ मार्च: वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर राज्याचे गृहमंत्र्यांनाही पदावरुन काढण्याची मागणी होऊ लागली आणि तशा चर्चाही राजकीय वर्तृळात सुरु झाल्या. दरम्यान, या सगळ्या चर्चांना तुर्तास तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुर्णविराम दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत.

गृहमंत्री पदासाठी कोणाचीही नावं समोर नाही आहेत तसेच, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं जयंत पाटील यांनी आज (१५ मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीआधी जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, ‘सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही आहे. गृहमंत्री अनिल देशमुखच राहतील’. दरम्यान, जो काही निर्णय असेल तो शरद पवार घेतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणामुळे गृहमंत्री पदावरुन अनिल देशमुख यांची बदली होणार नाही हे जरी स्पष्ट झाले असले तरी आयुक्तांची खुर्ची अजून वादात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या बैठकीनंतर राजकीय वर्तृळात काही बदल होतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे,

तसेच शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली होती.

 

News English Summary: After the suspension of controversial police officer Sachin Vaze, there was a demand for the removal of the state Home Minister and similar discussions started in the political circles. Meanwhile, NCP state president Jayant Patil has put an end to all these discussions. Home Minister Anil Deshmukh is doing a good job.

News English Title: Minister Jayant Patil reply over oppositions demand on resignations of home minister Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x