मलिकांचे मनसेला गांधीवादाचे डोस; भावाच्या हात-पाय तोडण्याच्या भाषेकडे दुर्लक्ष केलं होतं
मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला काल पार पडला. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी झाल्याच पाहायला मिळालं. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.
आझाद मैदानात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपली भूमिका मांडली. यावेळी आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. पण जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. असा आक्रमक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ज्या देशाने तुम्हाला सगळ दिल त्याला बरबाद करायला कशाला बसलाय असा सवाल देखील त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना विचारला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरेंना फटकारून काढलं. ‘दगडाला दगडाने आणि तलवारीने उत्तर देऊ असं कुणी बोलत असेल तर हे कायद्याचं राज्य आहे. शांतीप्रिय लोकं या राज्यात राहतात. हिंसा करण्याची भाषा असेल तर आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नाही’ अशा शब्दात मलिक यांनी राज ठाकरेंना सुनावलं. तसंच, ‘प्रत्येक पक्षाला स्वत: ची भूमिका स्वीकारण्याचा अधिकार आहे. आता काही पक्ष मोर्चे काढत आहे, पण त्यांच्यामागे कुणी तरी आहे. त्यांच्यामागे कुणीही असलं तरी या राज्याला काहीही फरक पडत नाही’, असं म्हणत मलिक यांनी भाजपचा उल्लेख न करत टीका केली.
तत्पूर्वी, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली होती. तसेच कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी दिली होती. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.
कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे ४ कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली होती. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली होती. कप्तान मलिक यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून मारहाण केल्याने खळबळ उडाली होती. रस्त्यावर एका ढिकाणी खोदकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं, या ठीकाणी मलिक आले आणि त्यांनी कामगारांकडून वर्क ऑर्डरची मागणी केली होती. त्यावेळी भावाच्या हातपाय तोडण्याचा भाषेवर मूग गिळून शांत राहणारे मंत्री नवाब मलिक सध्या मनसेला गांधीवादाचे डोस पाजत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
Web Title: Minister Nawab Malik criticized Raj Thackeray over MNS Maha morcha.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC