23 December 2024 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मंत्री गर्दी करून धुडघूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार - राज ठाकरे

Shiv Jayanti, Marathi language day, Raj Thackeray

मुंबई, २७ फेब्रुवारी: राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम (Marathi Bhasha Din) योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

मराठी स्वाक्षरी मोहिमेबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी जनतेलाही आवाहन केलं. “मला असं वाटतं की स्वाक्षरीची मोहीम पहिल्यांदाच होत नाहीये. फक्त यावेळी मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलं. माझी मराठीजनांना विनंती आहे की, आपली स्वाक्षरी मराठीत केली तर मराठीतून काहीतरी करतो हे मनात राहतं. मी सगळीकडे मराठीत सही करतो. प्रत्येक वेळेस आसवं गाळत बसण्यापेक्षा सुरूवात करणं गरजेचं आहे. दाक्षिणात्य माणसांबद्दलच नाही. सगळ्यांबद्दल बघा. दोन गुजराती जेव्हा एकत्र येतात.. तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात. मराठी येतात तेव्हा ते अनेकदा हिंदीमध्ये बोलतात,” असं म्हणत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

 

News English Summary: The state government denied permission for MNS programs. MNS president Raj Thackeray expressed anger over the government’s decision. “Ministers are crowded and the government rejects Shiv Jayanti, Marathi language day. If it seems that the crisis of Corona is coming, then the election should be postponed, ”said Raj Thackeray indignantly.

News English Title: Ministers are crowded and the government rejects Shiv Jayanti Marathi language day Raj Thackeray expressed anger news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x