8 January 2025 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

ED'चं ठरलंय? देशमुखांना चौकशीनंतर..? | गृहमंत्री वळसे पाटील, आव्हाड आणि मुंबई पोलीस आयुक्त वर्षावर

Anil Deshmukh

मुंबई, २९ जून | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिह‍िलेल्या पत्रात आपले वाढते वय आण‍ि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट म‍िळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे. तीन पानांच्या पत्रात अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात नोंदवलेल्या ईसीआयआरची प्रतही मागितली आहे.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे.

जर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीअंती अटक केली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. सरकारचं डॅमेज कंट्रोल, ईडी चौकशीला कसं सामोरं जायचं, या सर्व पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चर्चा होऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title:

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x