19 January 2025 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

बाळासाहेबांच्या स्मारकावरून मनसेचा सवाल | तर शिवसेनकडूनही प्रतिउत्तर

MNS, Shivsena, Balasaheb Thackeray memorial

मुंबई, १७ नोव्हेंबर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.

मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकासाठी फक्त जागा घेतली आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी स्मारक का उभारलेले नाही?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. स्मारक की मातोश्री तीन?? असा खोचक सवालही संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी महापौर बंगला हस्तांतरित करण्यात आला. मात्र अद्यापही तो बंदिस्त आहे. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? फक्त २३ जानेवारी आणि १७ नोव्हेंबर आलं की टेंडर काढलं आहे, त्याचं काम सुरु आहे हेच सांगितलं जातं. पुढे त्याचं काय झालं काहीही समजत नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. जर खरोखर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे? ते सर्वसामान्यांसाठी खुलं का नाही? जनता तिथे का जाऊ शकत नाही? कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं ते का वापरलं जातं? असे प्रश्नही संदीप देशपांडेंनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावत म्हटलं की, ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपावर टीका करता राऊत म्हणाले की, आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत, जेएनयूचं नाव बदलल्याने काय होणार? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे अभिमान आणि गौरव होते, त्यामुळे फक्त द्वेष भावनेतून नाव बदलणं, राजकीय हेतूने प्रेरित असणं हे ठीक नाही असं त्यांनी सांगितले.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut lashed out at MNS, saying that those who left Balasaheb alive should not speak on Balasaheb Thackeray’s memorial. Criticizing the BJP, Raut said, “We don’t need a certificate of Hindutva.” Swami Vivekananda has always been revered by us, what will happen if JNU is renamed? He said that Pandit Jawaharlal Nehru was the pride and glory of the country, so it was not right to change his name out of hatred and be motivated by political motives.

News English Title: MNS and Shivsena war over Balasaheb Thackeray memorial Shivsena News Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x