16 April 2025 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है

Ganesh chukkal, ram kadam, ghatkopar constituency, maharashtra assembly elections 2019

मुंबई: सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सभा, प्रचार, रुसवे, फुगवे, मनधरणी या सगळ्याच गोष्टी सगळ्याच पक्षात सुरु आहेत. प्रत्येक पक्ष हा आपल्या विरोधकांवर चांगलाच लक्ष ठेऊन आहे. त्यात सोशल मीडियाने तर अक्षरशः धुमाकूळच घातला आहे, अफवा पसरवणे किंवा कोणाची तरी बदनामी करणे हे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य झाले आहे.

असाच काहीसा प्रकार घाटकोपर मतदार संघात घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी काही शिवसैनिक देखील उपस्थित होते. मात्र चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच “ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है” असं कॅप्शन लिहून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं.

हि पोस्ट व्हायरल होताच मतदार संघात एकच गोंधळ उडाला आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्याची उत्तरं द्यावी लागली. काही दिवसांपूर्वी जेव्हा युतीची घोषणा झाली त्यावेळी एका शिवसैनिकाने घाटकोपर मध्ये बॅनर लावून १ संदेश देण्याचा प्रयत्न केला “साहेब माफ करा, पण यावेळी आमचं मतं राज ठाकरेंच्या मनसेला”. या बॅनरबाजीमुळे देखील लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं.

युतीधर्मानुसार घाटकोपरची जागा हि भाजपचे कार्यसम्राट आमदार राम कदम लढवत असून ते या सगळ्या घटनांमुळे चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. या घटनेनंतर राम कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच शिवसेना भाजपसोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तर शिवसैनिकांकडून गणेश चुक्कल यांच्याविरुद्द तक्रार करण्यात आली. त्यानंतर गणेश चुक्कल यांच्याकडून संबंधीत फेसबूक पोस्ट डिलीट करण्यात आली.

परंतु गणेश चुक्कल यांच्यामते शाखाप्रमुखांच्या परवानगीनंतरच आम्ही शिवसेना कार्यालयात गेलो होतो. शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात गैर काय, असा सवाल चुक्कल यांनी यावेळी उपस्थित केला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या