22 January 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात | त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे

MNS Chief Raj Thackeray, Chandrakant Patil

मुंबई, २९ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आजही राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले. यावरून शरद पवार हेच राज्य चालवतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली.

तसेच, उद्धव ठाकरे यांना राज्यातील प्रश्नांबाबत मी अनेकदा पत्रे लिहिली. पण त्यांनी माझ्या एकाही पत्राला उत्तर दिले नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. ठाकरे सरकार फार कुंथत कुंथत चालले असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरील प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात. त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे.

 

News English Summary: I often wrote letters to Uddhav Thackeray regarding issues in the state. But they did not reply to any of my letters, said Chandrakant Patil. Raj Thackeray had criticized the Thackeray government for being very slow. Answering the question, Chandrakant Patil said, Raj Thackeray speaks very clearly. They have a habit of speaking clearly.

News English Title: MNS Chief Raj Thackeray always talked straight forward said Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x