...आणि मूर्तिकारांना राज ठाकरेंनी दुसरा व्यावसायिक धोका सुद्धा लक्षात आणून दिला
मुंबई, ७ ऑक्टोबर : लॉकडाऊनच्या काळात जिम मालक चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पेणमधील मूर्तीकार यांनी आज राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी, या मागणीसाठी मूर्तीकारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
करोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळं येणाऱ्या अडचणी विविध व्यावसायिकांनी व विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या होत्या. तसंच, यावर तोडगा काढण्याची मागणीही केली होती. त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही राज यांनी दिलं होतं. यावेळेही पेणमधील मूर्तीकारांना राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला तसंच, एक धोक्याची सूचनाही दिली आहे.
राज ठाकरे यांनी मात्र यावेळी मूर्तिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या जागी शाडूच्या मूर्ती करण्याचा सल्ला दिला. “प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. विसर्जनानंतर चौपाट्यांवर त्यावर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण असतं. इतक्या श्रद्धेने ज्या गणपती बाप्पाची पूजा, विसर्जन करतो तीच मूर्ती किनाऱ्याजवळ असलेलं दृष्य बघायला खूप विदारक असतं. त्यामुळे शक्य असेल तितक्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणं हे जास्त संयुक्तिक असेल,” असं राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना सांगितलं.
राज ठाकरेंनी मूर्तिकांना वेगळा विचार करुन पाहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी उद्या जर परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही अशी धोक्याची सूचनाही दिली. राज ठाकरेंनी यावेळी मूर्तिकारांना पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा सल्ला देताना आपण समुद्रात विसर्जनासाठी काही वेगळा पर्याय उपलब्ध होईल का यासंबंधी सरकारमधील व्यक्तीशी चर्चा करु असं आश्वासन दिलं.
News English Summary: During the lockdown, Raj Thackeray was met by people from various areas like gym owner, driver, Dabewale in Mumbai. After that, the idol makers from Pen city has reached to meet Raj Thackeray today. The central government has banned the use of plaster of Paris (POP). The sculptors met Raj Thackeray to demand lifting of the ban.
News English Title: MNS Chief Raj Thackeray comment after meeting with Pen idol maker Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL