29 January 2025 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

महिला बचत गटातील महिलांचे कर्ज माफ करावं | मनसेची अर्थमंत्र्यांकडे मागणी

MNS chief Raj Thackeray, Ajit Pawar, Micro Finance

मुंबई, १५ ऑक्टोबर : महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असतांना सध्याच्या काळात या कर्जाची परतफेड ही अशक्य होतं आहे. त्यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करण्याचे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले आहे.

तसेच मार्च 2019 पासून पोलीस बांधवांना मिळणारे गृहकर्ज देणे बंद झाले, यात 2500 जणांना हे गृहकर्ज मंजूर होऊन देखील ते प्रत्यक्षात देण्यात आले नाही, त्यामुळे शेकडो पोलीस बांधवांची मोठ्या प्रमाणात आर्थिक तारांबळ होत आहे. याप्रश्नी तातडीने पाऊले उचलून हे गृहकर्ज त्यांना मिळवून देण्याची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेच्या या मागणीनंतर अजित पवार यांनी गृहसचिव सीताराम कुंटे यांना बोलवून घेत हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सात दिवसांमध्ये मराठी भाषेचा पर्याय त्यांच्या अ‍ॅपवर आणावा अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे. ज्या प्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य दिलं आि तिथे त्यांच्या भाषेत अ‍ॅप सुरु केलं तसंच अ‍ॅप महाराष्ट्रात मराठीत सुरु करावं अन्यथा या कंपनीचा दिवाळीचा सण मनसे स्टाइल साजरा होईल असा इशारा मनसेने दिला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी आज या दोन्ही कार्यालयांना भेट दिली. तसेच खडे बोलही सुनावले आहेत. टीव्ही नाइन मराठीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

News English Summary: MNS has demanded waiver of all loans of women in Mahila Bachat Gat. Also, the MNS delegation called on Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar today to take stern action against the bullying of women in self-help Bachat gat by microfinance companies. While women Bachat Gat have been repaying loans taken from microfinance companies on a regular basis for years, it is now impossible to repay these loans. Therefore, MNS has given a statement to Ajit Pawar to forgive the debts of the concerned women.

News English Title: MNS chief Raj Thackeray has made two more demands to the Mahavikas aghadi government News updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x