23 December 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
x

अलोट गर्दीतून राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांनी प्रथम ऍम्बुलन्सला जागा करून दिली

MNS Chief Raj Thackeray, Ambulance., Maha Morch

मुंबई: महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे अखेर हिंदू जिमखाना येथे दाखल झाले आहेत. मोर्चाला येण्यापूर्वी ठाकरे यांनी सपत्नीक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दुसरीकडे हिंदू जिमखाना परिसरा भगव्या रंगानं फुलून गेला आहे.

मात्र तत्पूर्वी राज ठाकरे हिंदू जिमखान्याच्या काही अंतरावर आल्यानंतर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याने स्वतः राज ठाकरे देखील ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यांचा ताफा अत्यंत मुंगीच्या गतीने पुढे सरकत असताना पाठीमागून एक ऍम्ब्युलन्स आल्याचं समजताच, स्वतः राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या गाड्यांच्या ताफ्याला बाजू करू देण्यास सांगितले आणि त्यानंतर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी देखील सामाजिक भान जपत जलदगतीने अँब्युलन्सला मार्ग करून दिला. त्यामुळे अलोट गर्दीतही मनसेने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीच दर्शन उपस्थितांना उघड्या डोळ्याने पाहायला मिळालं.

 

Web Title:  MNS Chief Raj Thackeray help to ambulance hang into heavy traffic.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x