24 January 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771
x

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांसोबत संवाद साधला

MNS Chief Raj Thackeray, MNS, MLA Raju patil, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (२५ ऑक्टोबर) कृष्णकुंजवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार होते. त्यानुसार सकाळी ११ च्या दरम्यान सर्व उमेदवार कृष्ककुंजवर उपस्थित झाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महारष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १०५ ठिकाणी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. परंतु, यामधील फक्त एकाच उमेदवाराचा विजय झाला आहे. तर बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. २०१४ च्या निवडणुकीतही महारष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला होता.

राज्याच्या निवडणुकांमध्ये महारष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. परंतु अखेरीस राज ठाकरे यांनी आपले १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. पण या निवडणुकीत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कल्याण ग्रामीणमधून महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील विजली झाले. पाटील यांच्या रूपात मनसेला केवळ एकच विजय मिळाला. २०१४ च्या निवडणुकीतही महारष्ट्र नवनिर्माण सेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

अनेक ठिकाणी महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी काँटे की टक्कर दिल्याचं पहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी तर महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान, राज ठाकरे आज सर्व उमेदवारांशी चर्चा करणार असून आत्मचिंतनही केलं जाणार असून २०२४च्या अनुषंगाने पक्ष पुन्हा कामाला लागू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x