22 January 2025 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

केंद्र सांगत जिम सुरु करा | राज्य म्हणतं नको | यांना वेगळी अक्कल आहे का - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Lockdown, Gym owners, Mumbai

मुंबई, ११ ऑगस्ट : तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत.

जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

केंद्र सरकार सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग तुम्हाला काही वेगळी अक्कल आहे का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिम सुरु केल्यानंतर प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या असे आवाहन देखीर राज ठाकरे यांनी केले आहे.

जिम व्यवसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले आहे. परंतु, अनलॉक प्रक्रिया चालू होऊन देखील त्यांची निराशा झाली आहे. विरोधाभास म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरिरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायाम तितकाच गरजेचा असून त्यासाठी जिम चालू असणे अत्यावश्यक आहे. मात्र, तरीही जिम व्यवसाय बंद आहे, ही मोठी शोकांतिका आहे, असं मत जिम चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

News English Summary: You start the gym, how many days are you going to spend in lockdown? Asking this question, MNS president Raj Thackeray appealed to the gym drivers to start a gym. The state government has not yet allowed gym drivers to start the gym.

News English Title: MNS Chief Raj Thackeray meet Gym owners in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x