तुमच्या मनातला राग २१ तारखेला व्यक्त करा: राज ठाकरे
मुंबई: मेट्रोमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होणार आहे. मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका येत्या काळात महाराष्ट्राला बसणार हे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ आर्थिक स्थिती धोक्यात आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा, मंदीचा येणार म्हणजे अजून लाखो लोकांच्या नोकर्या जाणार आहेत. अनेक बँका बुडणार आहेत, अशी ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे?, असा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे आयोजित प्रचार सभेत केला.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात १४ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केली. हा आकडा खूप मोठा आहे, मात्र तुम्हाला याचा अंदाज येणार नाही. याचा अर्थ दिवसाला तीन तासाला एक आत्महत्या या प्रमाणात शेतकर्यांनी गेल्या पाच वर्षात आत्महत्या केल्या आहेत, असे सांगत २ हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने छापणे बंद केल्याची बातमी मध्यंतरी वाचली. म्हणजे पुन्हा तुम्हाला रांगेत उभे राहावे लागणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. मुंबईत येणारी मेट्रोच मुंबईतील मराठी माणसाचा घात करणार आहे.
जिथे दळणवळणाची अशी साधने येतात, तिथे जागांचे भाव गगनाला भिडतात. आता मुंबईतले भाव तुमच्या हाताबाहेर जाणार. आरेतली एका रात्रीत २१०० झाडे कापून टाकली. आणि नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात आम्ही सत्तेत आल्यानंतर आरे जंगल घोषित करू. पुन्हा झाडे लावणार आहात का? रात्री लोक झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून करणारा रामन राघव मला आठवतोय. आरेमध्ये रात्री जाऊन झाडे कापणारे हे सरकार रामन राघवच आहे, असेही आरोप राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्राच्या मनातला राग व्यक्त व्हावा, त्या रागाला त्याचा आवाज विधानसभेत पोहचावा म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. परवा नितीन गडकरी पण म्हणाले की राज्य नीट चालवायचे असेल तर राज्याला सक्षम विरोधी पक्ष हवाय आणि त्याच भूमिकेतून माझे शिलेदार निवडणुकीला उतरले आहेत असं राज ठाकरे म्हणाले. जगातल्या युद्धांचा इतिहास सांगतो की ही युद्ध जमिनीच्या मालकीसाठी होत आहे. आज आपल्या हातातून आपली मुंबई निसटत आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आपण आपलीच असलेली मुंबई मिळवली. ही मुंबई हातातून निसटू देऊ नका असं राज ठाकरेंनी आग्रहाने सांगितलं.
नाशिक एमआयडीसी मध्ये आजपर्यंत २० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, वाहन क्षेत्रात मंदीचं सावट गडद आहे, तिथल्या नोकऱ्या जात आहेत. पुढचा काळ कठीण आहे म्हणून सांगतो सावध व्हा. आपल्या हातातून नोकऱ्या तर जात आहेतच पण जमीन पण आपल्या हातातून जात आहे. बुलेट ट्रेन कोणासाठी, मुंबईहून अहमदाबादला २ तासात जाऊन काय करायचं आहे? ह्या बुलेट ट्रेनचा भौगोलिक अंदाज घ्या तुमच्या लक्षात येईल की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.
देशातल्या मंदीचं सावट गडद होत चाललं आहे. नोटबंदीच्या १० व्या दिवशी मी माझ्या भाषणात सांगितलं होतं की जर ही नोटबंदी फसली तर देशातले उद्योगधंदे बंद होणार आणि लोकांच्या नोकऱ्या जाणार. आणि नेमकं तसंच सुरु आहे. पण ह्यावर माध्यमं बोलायला तयार नाहीत. शिवसेना म्हणते हीच ती वेळ… कसली हीच ती वेळ? ५ वर्ष काय केलंत? मी आज ठामपणे सांगतो की हीच ती वेळ आहे, महाराष्ट्रासाठी सक्षम विरोधी पक्ष निवडण्याची. तुमच्या मनातला राग २१ तारखेला व्यक्त करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल