18 January 2025 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

२०१४मध्ये राज ठाकरे यांनी ब्लू-प्रिंटमध्ये जे दाखवलं ते गांभीर्याने न घेणारा मुंबईकर आज रस्त्यावर?

MNS, Maharashtra navnirman Sena, Raj Thackeray, Blue Print

मुंबई: मुंबई शहरात सध्या #SaveAarey अभियानाने जोर धरला असून मुंबईकर देखील सरकारच्या पर्यावरण धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यावरणवादी संस्था, सामान्य मुंबईकर, प्राणी मित्रं ते शाळेतील विद्यार्थी देखील एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आरे मध्ये सध्या मेट्रो३ संबंधित कारशेड बनवण्याचे काम सुरु असून त्यासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि त्यामुळे येथे आढळणाऱ्या तब्बल २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती देखील नष्ट होणार आहेत. मात्र आपल्या सरकारला आणि प्रशासनाला तब्बल काहीही दुःख नाही.

मात्र याच विषयाची दुसरी बाजू देखील राजकारणापलीकडे जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. कारण मुंबईसंबंधित असे अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे भविष्यात मुंबईकरांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतील. अगदी सध्याचंच उदाहरण म्हणजे #SaveAarey अभियान म्हणावं लागेल, ज्याचा थेट संबंध संपूर्ण मुंबई शहराशी येतो. बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पट्ट्यातील आरे कॉलनी म्हणजे एक जंगलच आहे ज्यामध्ये तब्बल २१९ दुर्मिळ प्राणी आढळतात आणि त्यांचा मुक्त वावर येथे असतो. शहराच्या मध्यभागी असलेलं हेच जंगल अगदी ठाणे शहरापर्यंत पसरलं आहे. मुंबईतील २६ जुलैच्या पावसाच्या थैमानाने शेकडो मुंबईकरांचा जीव घेतला होता आणि त्याला मूळ कारण होतं, याच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावणारी मिठी नदी, जिचा प्रवाह आरेच्या जंगलातून देखील जाते. मात्र अनधिकृत बांधकामातून त्या नदीचं अस्तित्वच भ्रष्ट सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संपुष्टात आणलं. त्याला तितकेच मुंबईकर देखील जवाबदार आहेत.

याच संजय गांधी ते आरे’पर्यंत अनेक अनधिकृत इमारतींनी तोंड वर काढली आहे आणि त्यात आरेयेथील ‘रॉयल पाल्म’ या विस्तीर्ण मलईदार जमिनीवर सध्या राजकारण्यांचा डोळा आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर, नुकताच फडणवीस सरकारने मुंबई शहराचा नवीन विकास आराखडा मंजूर केला. त्यात केल्या बदलानुसार केलेल्या बदलांनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एकूण १६५ हेक्टर जमीन ही पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या भागातून वगळण्यात आली आहे. नेमका तिथेच सरकारने आरेसंबंधित घाट घालून, नव्या बदलातच आरे कॉलनीतील कारशेडसाठीची ३३ हेक्टर जमीनही त्याच १६५ हेक्टर जमीन समाविष्ठ केली आहे. म्हणजे ज्या आरेला सरकार फक्त हिरवळ म्हणतं, मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एकूण १६५ हेक्टर जमीन जी पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या वन विभागाच्या जमिनीत आरे कॉलनीतील कारशेडसाठीची ३३ हेक्टरची हिरवळ झाली आणि बाकीची जंगल असं सरकारला वाटू लागलं आहे. आता न्यायालयात देखील याच बदलांचा आधार घेत सरकार मुंबईकरांना आणि पर्यावरणवाद्यांना तसेच प्राणी मित्रांना खोटं ठरवत आहे.

राजकारणापलीकडे जाऊन एक विषय लक्षात घेतल्यास असं लक्षात येईल की याच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं आणि आरेचं मुंबई शहरातील महत्व २०१४मध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सादरीकरण करून पटवून दिलं होतं. मात्र कोणताही विषय हाताबाहेर जात नाही तोपर्यंत मुंबईकर जागा होत नाही हे नित्याचं झालं आहे. तसाच प्रकार आज मुंबई शहरात घडताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी संपूर्ण प्रेझेंटेशन द्वारे शहराचं फुफ्फुस असलेल्या या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं आणि त्यालाच लागून असलेल्या आरे या जंगल पट्ट्याचं महत्व पटवून दिलं होतं. मात्र आजचा #SaveAarey करत रस्त्यावर उतरलेला मुंबईकर हा देखील त्यावेळी झोपलेलाच होता आणि त्याने देखील २०१४ मध्ये हा विषय राजकीय नजरेतून पाहिला आणि मृगजळाच्या जाहीरनाम्यात अडकून भक्त झाला आणि आज जे व्हायचं ते झालं आहे.

एका व्यक्तीने जे २०१४मध्ये सांगितलं ते मुंबईकरांना २०१९मध्ये तरी पूर्णपणे उमगलं आहे याची आजही शास्वती देता येणार नाही. मात्र आज तरी मुंबईकरांनी राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये आजच्या ज्वलंत विषयावरील केलेलं सादरीकरण पाहावं आणि वेळीच शहाणं व्हावं इतकंच काय ते बोलू शकतो. अन्यथा भविष्याचा विचार करता पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन साठवायला सुरुवात करावी.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x