23 January 2025 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

मनसेने ईडीच्या फलकाविरोधात बीएमसी 'ए वार्डला' पत्रक सोपवलं; पालिका सत्ताधारी पेचात

BMC, ED Office, Raj Thackeray, MNS, Shivsena, Marathi Patya

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियमाचे आणि कायद्याचे पालन करत ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर राज्यभरातील महाराष्ट्र सैनिक संतापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पाठी ईडीचा डाव आखून सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. रस्त्यावर देखील राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं.

मात्र त्यानंतर संतापलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी समाज माध्यमांवर राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यावरच भडास काढली आणि काही क्षणात त्या अधिकाऱ्याने देखील बातम्या प्रसिद्ध होताच स्वतःचा प्रोफाइल डिलीट मारला. तसं म्हटलं तर अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस मिळाली की बऱ्याच नेत्यांना धडकी भरते. कारण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या ईडीच्या विरोधात कोणी फार काही करू शकत नाही असा समज आहे.

परंतु या ईडीला देखील मनसे कार्यकर्ते रडीला आणत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आता ईडीलाच मनसेच्या आणि कायद्याच्या भाषेत नोटीस देण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली आहे. या ईडीने एक नियमभंग केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती आणि त्याची एक प्रत स्थानिक ईडी कार्यालयाला दिली होती.

त्यात अजून भर पडली आहे आणि त्यामुळे मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप देखील पेचात अडकली आहे. मुंबईत ईडीच्या कार्यालयाचा नामफलक हिंदी आणि इंग्रजीत आहे. शासकीय नियमानुसार स्थानिक भाषेत म्हणजे मराठीतही हा फलक असायला हवा. सर्व शासकीय कार्यालयांना तशी सक्ती आहे. परंतु ईडीने कायद्याचं सरळसऱळ उल्लंघन केले आहे. तसे न केल्यास दंडाचीही तरतूद आहे. याबाबत मनसेने मराठी भाषा विभागाकडे याआधीच तक्रार केली आहे. तसेच ईडीलाही त्याची प्रत पाठविली होती. मात्र मनसेने मुंबई महानगर पालिकेच्या ए वार्डला देखील अधिकृतपणे पत्रक दिलं असून कायदेशीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी शिवसेना-भाजप प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x