25 December 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

'पा’दरे’ पावटेंच्या सल्ल्याची मनसेला गरज नाही; अमेय खोपकरांचा भाजपच्या बोलघेवड्यांना टोला

MLA Praveen Darekar, MLA Ram Kadam

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टीका केली आहे. “पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राज ठाकरे आणि आम्हांला काडीचीही गरज नाही”, असं अमेय खोपकर यांनी ट्वीट करत प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावल निशाणा साधला.

महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली, त्यांनी महाराष्ट नवनिर्माण सेनेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते राम कदम यांच्यावर टीका केली आहे.

राम कदम यांना जुने दिवस आता आठवत नसतील कदाचित, पण जेव्हा ते महाराष्ट नवनिर्माण सेनेमध्ये होते तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. महाराष्ट नवनिर्माण सेना आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत, असं म्हणत खोपकर यांनी राम कदम यांंच्यावर निशाणा साधला आहे.

मनसेने आपली विचारधारा सोडली तर भारतीय जनता पक्षासोबत घेण्याचा विचार करु असं विधान विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं होतं. त्यावरुन अमेय खोपकर म्हणाले की, विचारधारा वगैरे शब्द दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title:  MNS Leader Amey Khopkar slams BJP MLA Ram Kadam and MLA Praveen Darekar.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x