23 November 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

महापालिकेचा 'वरुण' गोंधळ आतून तमाशा, पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता बाहेर आलाय

MNS Leader Amey Khopkar, Yuvasena Leader Varun Sardesai

मुंबई, २९ जून : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे. “पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?”, अशी जहरी टीका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे.

महानगरपालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा, असा कारभार सुरू आहे. मढ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश आम्ही करणारच, पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण हा वरुण सरदेसाई, हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणारा, उलट संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत त्यांनीच २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे, आहे हिंमत उत्तर द्यायची? असे प्रतिआव्हान मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी वरुण सरदेसाईंना दिले आहे.

संदीप देशपांडे यांनी २६ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली.

 

News English Summary: MNS Chitrapat Sena president Ameya Khopkar has criticized. Who is Varun Sardesai who has just come out of the penguin’s egg? Who is going to ask us to apologize? ”, Ameya Khopkar has made a venomous remark on Twitter.

News English Title: MNS Leader Amey Khopkar slams Yuvasena Leader Varun Sardesai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AmeyKhopkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x