22 November 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सगळ्यांच्या एकत्रीत लढ्याला यश | अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले

MNS leader Amit Raj Thackeray, CM Uddhav Thackery, Aarey Metro car shed Relocated, Kanjurmarg

मुंबई, ११ ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे. दरम्यान, यावर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरे बचाव आंदोलनाला अखेर यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडचा निर्णय रद्द केला आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे.

‘हा लोकांच्या संघर्षाचा विजय आहे. मी समजू शकतो आज आरे कारशेडसाठी आंदोलन करणारी लोकं किती आनंदी असतील. अनेकांनी आंदोलन करताना अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्या सगळ्यांच्या लढ्याला यश आलं आहे’, असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठाकरे सरकारचे आभार मानले आहे.

आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. यासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली होती. पण, शिवसेनेसह मनसे आणि पर्यावरण प्रेमींनी या कारशेडला कडाडून विरोध केला होता. अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होण्याआधी आरे कारशेडसाठी आंदोलन केले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधील मेट्रोचा कारशेड कांजुरमार्गला हलवण्याची घोषणा केली आहे.

 

News English Summary: The Aarey Bachao movement, which has been going on for the last several years, has finally come to fruition. State Chief Minister Uddhav Thackeray has canceled the decision of Aarey Metro car shed. Uddhav Thackeray’s nephew and MNS leader Amit Thackeray has welcomed the decision. ‘This is the victory of the people’s struggle. I can understand how happy the people who are agitating for Aarey carshed will be today. Many were carrying cases during the agitation. The struggle of all of them has been successful, ‘said Amit Thackeray, thanking the Thackeray government.

News English Title: MNS leader Amit Raj Thackeray thanked CM Uddhav Thackery for the decision of Aarey Metro car shed Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x