... मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का? | मनसेचं शिवसेनेला प्रतिउत्तर

मुंबई, २६ नोव्हेंबर: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यानंतर फडणवीसांनी मनसेसोबत युती शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
यातच परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका केली होती. अनिल परब म्हणाले होते की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल, मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे, आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने घेतली आहे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल असं ते म्हणाले होते. याला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का?, असा प्रश्न विचारत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब (MNS Leader Bala Nandgaonkar reply to Minister Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेला सुपारी घेऊन काम करणारा पक्ष आहे. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का? अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहित आहे. जाऊन केबल वाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल.” असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांवर टिकास्त्र डागलं आहे. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षासोबत युती करायची की नाही? याचा अधिकार पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. सध्या एकला चलो रे अशीच आमची भूमिका असल्याचं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं आहे. ते सोलापुरात बोलत होते.
News English Summary: You say we are betel nut takers, are you an installment taker? Anil Parab and my journey has been the same. So I know exactly who does what. Go and ask the cable guys, then they will know. Saying this, Bala Nandgaonkar has castigated Transport Minister Anil Parbhan. Also, whether to form an alliance with Bharatiya Janata Party in Mumbai Municipal Corporation elections or not? This will be taken over by party chief Raj Thackeray. If the party leaders take a decision, we welcome it. At present, Bala Nandgaonkar has expressed the view that our role is the same. He was speaking in Solapur.
News English Title: MNS leader Bala Nandgaonkar reply to Transportation Minister Anil Parab news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC