23 February 2025 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का | कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला - मनसे

MNS Leader Sandeep Deshpande, Mumbai Mayor Kishori Pedanekar, Covid Contract given to son

मुंबई, २० ऑगस्ट : कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.

मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज दादर येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. ‘करोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारण करू नये. सर्वांना या संकटाशी एकजुटीनं लढायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत होते. इतर पक्षही त्यावेळी करोनाच्या संकटाशी लढण्यात व लॉकडाऊनमुळं अडचणी आलेल्या जनतेला धीर देण्याच्या कामात व्यग्र होते. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती असं आमच्या निदर्शनास आलं आहे, असं देशपांडे यांनी सांगितलं. ‘महापौर पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीनं गैरमार्गानं काम मिळवल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. ‘दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता परस्पर एखाद्याला बोलावून अॅग्रीमेंट केलं जातं यातच सर्व काही आलं,’ असं देशपांडे म्हणाले.

कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोरोना काळात राजकारण करु नका पण भ्रष्टाचार करा असं कामकाज करणार असाल तर मनसे गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उचलणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनीही हा मुद्दा सभागृहात उचलून धरावा असं आवाहन मनसेने केले आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी हेदेखील उपस्थित होते.

 

News English Summary: While reiterating allegations of corruption in the construction of Covid Center for Corona patients, MNS has directly targeted Mumbai Mayor Kishori Pednekar. MNS has made a serious allegation that the mayor got the contract of Covid Center in Mumbai for his own son.

News English Title: MNS Leader Sandeep Deshpande Allegation on Mumbai Mayor Kishori Pedanekar over Covid Contract given to his own son News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x