24 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

दु:ख हेच की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करतेय

MNS leader Sandeep Deshpande, Serious allegations, Shivsena

मुंबई, ०४ फेब्रुवारी: वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.

मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं.

मुंबईत शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा याआधीच केली होती. पण तसं काही झालंच नाही. आता शिवसेनेकडूनच फेरीवाल्यांना रितसर पावती देऊन खंडणी वसूल केली जात आहे. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. याशिवाय सार्वजनिक पथाचा वापर करणाऱ्यांना होणार उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणार आकार असं लिहीण्यात आलं आहे”, असं संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेल्या पावतीच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचं सांगताना संदीप देशपांडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. “बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून खंडणी वसूल केली जातेय. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे”, असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावले.

दरम्यान , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

 

News English Summary: Tears welled up in Sandeep Deshpande’s eyes as he said that the ransom was being collected through a receipt with a photo of the late Shiv Sena chief Balasaheb Thackeray. “The ransom is collected by putting the photo of Balasaheb, the Chief Minister, the Environment Minister on the receipt. I am most saddened that there is a photo of Balasaheb on the receipt,” said Sandeep Deshpande.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande made serious allegations on Shivsena news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x