27 April 2025 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
x

हे बाप्पा! देशाचे आर्थिक संकट टळूदे, हिटलर शाही जाऊन लोकशाही नांदू दे: संदीप देशपांडे

Ganapati Bappa, Shir Ganesh Chaturthi

मुंबई : आज घरोघरी श्री गणेशाचं आगमन मोठ्या आनंदात आणि उत्साहात झालं आहे. अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे स्वतःच्या इच्छा व्यक्त करत विघ्नहर्त्याला साकडं घातलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतत भाजपच्या एकूणच कार्यपद्धतीवर हिटलर शाहीचा आरोप सातत्याने केला आहे. विरोधकांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप एनेक वेळा विरोधकांनी केला आहे.

मात्र आजच्या शुभ दिनी अनेक राजकारण्यांनी देखील आपल्या लाडक्या बाप्पाकडे साकडं घालत इच्छा व्यक्ती केली आहे. त्यामध्ये राज्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणरायाकडे केली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी म्हटलं की, माझ्या मुलाला मी सगळ्यात जास्त ओळखतो. तो काहीही चुकीचं करणार नाही. त्यामुळं त्यांच्यावरील ‘ईडी’चं विघ्न बाप्पा नक्कीच दूर करेल,’ असा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला.

दुसरीकडे मनसेला भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धतीचा एक देशावरील एक संकट वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बाप्पाला साकडं घालताना म्हटलं की, ‘देशाचे आर्थिक संकट टळूदे, हिटलर शाही जाऊन लोकशाही नांदू दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना’.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या