5 November 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

सीबीआय-ईडी या स्वायत्त संस्था राहिल्या नसून त्या भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत: संदीप देशपांडे

MNS, Raj Thackeray, Sandeep Deshpane

मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. तुमच्या विरोधात बोलेल, तुमची प्रकरणं बाहेर काढेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल त्याच्यावरुद्ध दाबावतंत्राचा वापर करायची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. सीबीआय असेल किंवा ईडी असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या नाहीत तर त्या भाजपाच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत.

कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अँड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि ८६० कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठी ते ईडीच्या रडारवर होते. वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. हे सगळं बहुमताच्या जोरावर सुरु आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. परंतु त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्याचबरोबर नुकतेच ईव्हीएमविरोधात विरोधकांची एकजूट करून त्यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे राज यांना ही नोटीस आली असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. परंतु राज ठाकरे किंवा मनसेकडून या वृत्ताला अद्याप काही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x