15 January 2025 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

मनसेच्या झेंड्यासोबतच कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलर'मध्ये सुद्धा भगवा जोश

MNS Maha Adhiveshan, Raj Thackeray, MNS New Flag, Hindutva

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. परंतु, त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवीन झेंड्यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला असून त्यात मध्यभागी शिवमुद्रा तर दुसऱ्या झेंड्यांच्या मध्यभागी पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन दाखविण्यात आलं आहे. या चिन्हाच्या खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचं चिन्ह असलेला झेंडा वापरण्यात येणार असून मागील काळात राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे शिवमुद्रा असलेला झेंडा शिवजयंती, महाराष्ट्र दिन व अन्य मराठी सणांमध्ये वापरण्यात येणार असल्याचं कळतंय. एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार मनसेचा नवीन प्रस्तावित झेंडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून त्याला मान्यताही मिळाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या नव्या झेंड्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील मफलरचा रंग देखील बदलणार आहे. कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगव्या रंगाचा मफलर दिसणार आहे. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोगेश्वरी येथील जय जवान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना उद्या झेंड्यासोबत हा मफलरही बदलणार असे सांगितले.

 

Web Title:  MNS Maha Adhiveshan in Mumbai will change Flag and party workers Muffler too.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x