23 December 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
x

मनसे महामोर्चा'नंतर विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सभेच्या मैदानाची स्वच्छता

MNS Maha Morcha, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला काल पार पडला. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी झाल्याच पाहायला मिळालं. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.

मनसेच्या महामोर्चात राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी सीएए-एनआरसी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना इशारा दिला. तसेच हिंदूवरही भाष्य केले. आपण केवळ दंगल झाली की हिंदू असतो. एरवी तसे आम्हाला जाणवत नसते, असा टोला त्यांनी लगावला. जे या देशाचेच नाहीत त्यांच्याकडे आपण का पुरावे मागायचे. बॉम्बस्फोट झाला की आपण फक्त मेणबत्त्या काढायच्या. माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना ४८ तास मोकळं सोडा. गुन्हेगारी शून्य होईल. घुसखोरांची सफाई आता झालीच पाहिजे. याबाबत राज्य सरकारला सांगून उपयोग नाही. केंद्रालाच सांगायला हवं, असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

या विराट महामोर्चाला लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजारी लावल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यासोबत मोठ्या प्रमाणावर पोटाची भूक भागविण्यासाठी आणि तहानलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वतःची खाण्याची तसेच पाण्याची सोय केली होती. परंतु, त्यानंतर सामाजिक जवाबदारी जपत आणि आपल्या मोर्च्यांचा सामन्यांना त्रास नको म्हणून सभा संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संदीप पांचंगे यांच्या नैतृत्वाखाली संपूर्ण मैदानाची स्वतःचा केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मनसे पक्ष नेहमीच स्वतःची सामाजिक जवाबदारी जपतो हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

 

Web Title:  MNS Maha Morcha Vidyarthi Sena Made Azad Maidan Ground clean after rally.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x