24 November 2024 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

सत्तेसाठी सर्वच पक्षांचे हात पकडून झालेल्या सेनेला महामोर्चामागे भाजपचा हात दिसला

MNS Mahamorcha, Raj Thackeray, Manisha Kayande

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला काल पार पडला. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी झाल्याच पाहायला मिळालं. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.

तत्पूर्वी, ‘शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळं त्यांना कुणाचा तरी आधार हवा आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग मधल्या काळात त्यांनी करून पाहिला. पण तोही फसला आहे. त्यामुळं भाजप आता मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करतेय. आशिष शेलार यांनी मागील काही दिवसांत घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटी हे त्याचंच द्योतक आहे. या बैठकांमध्येच मोर्चाच ठरलंय हे आता स्पष्ट दिसतंय. हे सगळे पाहिल्यास आजच्या मोर्चामागे भाजप असू शकते,’ असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला आहे . तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांनी देखील तसेच आरोप केले आहेत.

मनसेच्या स्थापनेनंतर उत्तर भारतीयांच्या राजकारणावरून काँग्रेसने मनसेला मोठं केल्याचा आरोप याआधी शिवसेनेने सातत्याने केला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज ठाकरे हे बारामतीच्या म्हणजे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे सांगून युतीला नुकसान होण्यासाठीच शरद पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी होत असल्याचं शिवसेना सातत्याने म्हणत होती. वास्तविक विधानसभा निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचं सिद्ध झालं आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीशी संपर्क केल्याचं देखील मान्य केलं. सध्या संजय राऊत तर बारामतीचे गुणगान करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

मात्र आज त्याच शिवसेनेला मनसेच्या सध्याच्या भूमिकेमागे भाजपचा हात दिसत आहे. इतर नेत्यांच्या सांगण्यावर एखादा पक्ष भूमिका केव्हा झेंडा बदलतो असं समजणं म्हणजे राजकारणच कळत नसल्याचं चिन्हं म्हणावं लागेल. राजकारणात केवळ परिस्थितीनुसार निर्माण झालेली पोकळी भरून काढणं यालाच राजकारण म्हणतात आणि तेच राज ठाकरे करत आहेत. मात्र शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या सर्वांचे हात मनसेच्या डोक्यावर असल्याचं सांगण्याच्या नादात स्वतः या सगळ्या पक्षांचे हात हातात धरून झाली आहे आणि काहींचे सध्या धरले हेत हेच विसरल्याचं दिसत आहे. त्यामुळे मनसे पेक्षा शिवसेनाच अधिक संभ्रमात असल्याचं दिसतं आणि तो संभ्रम कालच्या विराट मोर्चामुळे यापुढे अधिकच वाढलेला दिसले असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.

 

Web Title:  MNS Mahamorcha in Mumbai was supported by BJP says Shivsena Leader Manisha Kayande.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x