21 November 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल
x

आ. राजू पाटलांचा सेनेला सावधतेचा इशारा 'धनुष्य आलंय मोडकळीला, जाणीव नाही “बाणा”ला?

MNS MLA Raju Patil, Shivsena, Uddhav Thackeray, BJP

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.

माझ्यासमोर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय झालेला नव्हता. किंबहुना या विषयावरूनच बोलणी फिसकटली होती. ती थांबवली गेली. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली, त्या वेळी हा विषय नव्हता. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षांची चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही. पण मी राष्ट्रीय अध्यक्षांना आणि गडकरींनाही याविषयी विचारलं. भारतीय जनता पक्षाने असा कुठलाही शब्द शिवसेनेला दिलेला नव्हता असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून ठणकावून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मान डोलवली.

महत्वाचं म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी हे बोलून दाखवलं की भाजपने शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी भाजपच्या एकूण दीर्घकालीन खेळीवर अभ्यास केल्यास त्यात तथ्य असल्याचं दिसतं आणि त्याबद्दल अनेकदा खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा भाष्य करत भाजपच्या एकूण योजनांवर बोट ठेवत सेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. दरम्यान, तसाच काहीसा सावधतेचा इशारा मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सेनेला एक ट्विट करून दिला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून;

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x