15 January 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

आता ‘U’ ‘T’urn नको! बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडालायची हीच वेळ: आ. राजू पाटील

Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena, Bullet Train, MNS MLA Raju patil

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकाम कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलेट ट्रेनला अनेक स्तरावरुन विरोध करण्यात येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर निशाणा साधला होता. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी आता यू- टर्न नको, हिच ती वेळ म्हणत मुख्यमंत्र्यांकडे बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची मागणी केली आहे.

राजू पाटील ट्विट करत म्हणाले की, बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणारा हिस्सा व त्यासाठी बीकेसी व इतर ठिकाणी भूसंपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरण्याची विनंती केली आहे.

तत्पूर्वी महिनाभर राज्यातील सत्तास्थापनेचा गोंधळ सुरु असताना, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या बाबतीत मात्र एक अपवादात्मक प्रकार पाहायला मिळत होता. सत्तास्थापनेसाठी अपक्षांपासून एक-एक आमदाराच्या समर्थनाचा भाव वाढलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यासर्व राजकीय बाजाराकडे दुर्लक्ष करत जोरदारपणे कल्याण-डोंबिवली शहरातील मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पातळीवरील प्रशासकीय पाठपुरावा सुरु केला होता.

आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा आराखडा रेल्वेकडे सादर केला होता. त्या आराखड्याला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने त्यावेळच्या भेटीत दिले होते. कोपर रेल्वे उड्डाणपूल, लोकग्रामचा पादचारीपूल, पत्रीपूल आणि डोंबिवली स्थानकातील पादचारीपूल यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेचे एडीएमआर एस.आर.कक्कड यांची भेट घेतली होती.

कोपर रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने रेल्वेच्या आदेशानुसार महापालिकेने बंद केला. त्याच्या दुरुस्तीचा आराखडा १७ ऑक्टोबरला महापालिकेने रेल्वेकडे पाठविला. मात्र, रेल्वेकडून त्याला मंजुरी देण्यात दिरंगाई होत असल्याने पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी कोपर पुलाच्या दुरुस्तीचा आराखडा मंजूर केला जाईल असं आश्वासन दिल होते.

आमदार राजू पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार सदर विषयाला अनुसरून महापालिकेने तातडीने पुलाच्या दुरुस्तीचे प्राकलन तयार केले. त्यानुसार, दुरुस्तीच्या कामासाठी १८ नोव्हेंबरला निविदा प्रसिद्ध केली जाणार होती. निविदा प्राप्त होऊन निविदेस तातडीने मंजुरी देऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरु केले जाईल, असा दावा प्रशासनाने केला यापूर्वीच आहे. त्यामुळे येथे मनसेचा आमदार निवडून येताच कल्याण-डोंबिवलीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x