23 December 2024 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
x

शिवसेनेने अबू आझमी'सोबत राहावं; आम्हाला हिंदुत्व शिकवू नये: आ. राजू पाटील

MLA Raju Patil, Shivsena

मुंबई:  मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता . त्यावर मनसेचे खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण-डोंबिवलीतून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘शिवसेनेनं आपलं बघावं, आम्हांला हिंदुत्व शिकवू नये, तुमचं हिंदुत्व अबू आझमीसोबत सुरु राहूंदेत अशी सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. तर “अजित पवार हे सरकार चालवत असून थोड्या दिवसांनी शिवसेना देखील चालवतील”, अशी खोचक टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर केली आहे.

महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

याबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, देशाच्या व्यवस्थेवर घुसखोरांचा ताण असल्याने जो कोणी देशभक्त आहे ते मनसेचा मोर्चाला सहभागी होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी जी आक्रमक भूमिका पाकिस्तानी, बांग्लादेशीविरोधात घेतली होती. मात्र सत्तेच्या हवास्यापोटी शिवसेनेने सोयीस्कररित्या ही भूमिका बाजूला सारली आहे. शिवसैनिकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मनसेच्या मोर्चाला मिळताना दिसत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेची स्पेस मनसे भरुन काढतंय, त्यामुळेच शिवसेनेकडून अशाप्रकारे टीका होत आहे. मनसेने मोर्चाचं नेतृत्व केलं असलं तरी अनेक देशभक्त या मोर्चात सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन मोर्चात लोकांनी सहभाग घेत असतील असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

 

Web Title:  MNS MLA Raju Patil slams shivsena Party leader over Hindutva agenda.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x