23 January 2025 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

अध्यक्ष महोदय! तुम्ही तर DJP पार्टीवाले, 'दुसऱ्यांची जाळ्यात पकडा'

MNS, Devendra Fadanvis, Tulsi Joshi

पालघर : काल एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना, लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेच्या निर्णयावर मनसेचा उल्लेख ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेला पक्ष’ असा केला आहे. त्यावरून महाराष्ट्र सैनिकांनी देखील देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच लक्ष केलं आहे.

राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांकडून देखील मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील एक व्हिडिओ व्हायरल करून फडणवीसांना चांगलंच धारेवर धरलं होतं. परंतु पालघरचे आक्रमक महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी मात्र भाजपचा उल्लेख ‘डीजेपी’ केल्याने समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजप काँग्रेस किंवा इतर पक्षातील उमेदवार आयत्यावेळी आपल्या जाळ्यात पकडण्याचे प्रकार मागील ४-५ वर्षांपासून करत आहे. नेमका त्याचाच धागा पकडत तुळसी जोशी यांनी भाजपचा उल्लेच ‘डीजेपी’ म्हणजे ‘दुसऱ्यांची जाळ्यात पकडा’ असं नामकरण केलं आहे. मागे एका सभेत राज ठाकरे यांनी देखील भाजप इतरांची पोरं स्वतःच्या कडेवर घेऊन फिरत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे यापुढे भाजपचं समाज माध्यमांवर ‘डीजेपी’ असं नवीन नामकरण झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

काय म्हटलं आहे तुलसी जोशी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर?

अध्यक्ष महोदय! तुम्ही DJP पार्टीवाले, ‘दुसऱ्यांची जाळ्यात पकडा’ पार्टीवाले. स्वतःचे उमेदवार आहेत कुठे तुमच्याकडे. निवडणुका आल्या की काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देऊन, काँग्रेसच्या उमेदवारांनाच जाळ्यात पकडून लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे मागील अनेक वर्षांपासून सुरु आहेत. देश काँग्रेसमुक्त करता करता ‘डीजेपी’ पक्ष कधी काँग्रेसयुक्त झाला त्याचा पत्ता अजून भक्तांना देखील लागलेला नाही. दुसऱ्यांच्या पक्षाचे नामकरण सोडा आधी तुमच्या पक्षाचे नामकरण BJP वरून DJP करा, म्हणजे ते अगदी मॅच होईल बघा…’दुसऱ्यांची जाळ्यात पकडा’.

राज साहेब! तुम्ही केवळ मोदींना आणि अमित शहांना लक्ष करत राहा….बाकी राज्यातील या ‘डीजेपी’च्या विनोद वीरांना आम्ही सांभाळतो! जय महाराष्ट्र!

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x