3 December 2024 11:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

आपत्तीच्या काळात भ्रष्ट अधिकारी स्वत:च्या तुमड्या भरुन घेत आहेत - मनसेचा आरोप

MNS Sandeep Deshpande, BMC Scam

मुंबई, १३ जून : राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ३,४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर पोहचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र महापालिकेतील काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशापांडे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वत:च्या तुमड्या भरुन घेत आहेत. त्यांना एकच इशारा आहे, तुमच्यावर आमची करडी नजर आहे. कोरोनाचं संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, अशा शब्दात संदीप देशापांडे यांनी इशारा दिला आहे.

दुसरीकडे, मुंबईत कोरोना विषाणूच्या रुग्णांचे रोज मृत्यू होत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून रुग्णांचे मृतदेह प्लस्टिकच्या पॅक बंद बॅगमध्ये ठेवला जातो. मात्र पालिकेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या ‘स्पेशलाइज’ बॉडी बॅगबाबत भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांच्याकडून आरोप झाल्यावर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. या आधी पालिकेने केंद्र सरकारच्या निकषांनुसारच महापालिका रुग्णालयांसाठी २ हजार २०० बॉडी बॅग्जची खरेदी करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५५ हजार ३५७ वर तर मृतांचा आकडा २ हजार ४२ वर पोहोचला आहे. ‘कोविड-१९’ ने बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सदर मृतदेह ‘बॉडी बॅग’मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. त्यासाठी पालिकेने संकेतस्थळावरुन निविदा प्रक्रिया राबवली होती. केंद्र सरकारच्या निकषांनुसारच बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या स्तरावर उत्पादनाची तांत्रिक छाननी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या नेमण्यात आलेल्या ‘पॅनल’ द्वारेही याबाबत तंत्रशुद्ध छाननी करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या बॉडी बॅगची केंद्र शासनाच्या संकतेस्थळावर ७ हजार ८०० रुपये इतकी किंमत आहे. ही एक बॅग महापालिकेला ६ हजार ७०० रुपयांना उपलब्ध झाली असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. दरम्यान, आ. नितेश राणे यांनी ही बॉडी बॅग जास्तीत जास्त १५०० रुपयांना उपलब्ध असताना ६ पट अधिक दराने महापालिकेकडून खरेदी होत असल्याबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.

 

News English Summary: Currently, corrupt officials of the corporation are filling their own pockets in the name of emergency. They have only one warning, we are keeping a close eye on you. Sandeep Deshapande has warned that this Maharashtra soldier will not remain silent unless the Corona crisis is over.

News English Title: MNS party leader Sandeep Deshpande has warned corrupt officials Municipal Corporation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x