23 December 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील विकास कामांवरून मनसे शिवसेना वाद पेटला

MNS party, Shivsena, Worli constituency, Minister Aaditya Thackeray

मुंबई, २५ फेब्रुवारी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष करण्यात आलं असून त्याला वरळी मतदारसंघातील विकास कामं कारण ठरली आहेत. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे शिवसेनवर आरोप केल्याने पुन्हा राजकीय वाद पेटल्याचं चित्र आहे. विषय थेट आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाशी संबंधित असल्याने शिवसेना नगरसेवक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

वरळी मतदारसंघातील प्रेमनगर रहिवाशी भागात सार्वजिनक शौचालयाची दुरावस्था मागील काही महिन्यापासून सुरू आहे, याठिकाणी मागच्यावेळी येऊन आम्ही येथील नागरिकांचे हाल फेसबुकद्वारे मांडले त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची तात्काळ दखल घेऊन प्रेमनगर भागात शौचालयाच्या दुरुस्तीचा शुभारंभ करत नारळ वाढवला, परंतु मागील दोन महिन्यापासून याठिकाणी प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरुवात नाही, लोकांना आज देखील त्याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, शौचालयांना दरवाजे, लाईट नाही, लोकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संतोष धुरी यांनी केला, याबाबत त्यांनी फेसबुक लाईव्ह करत ही समस्या मांडली. (MNS party slams Shivsena over Worli constituency of minister Aaditya Thackeray)

परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले सगळे आरोप शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांनी फेटाळून लावले आहेत. प्रेमनगर भागात शौचालयाच्या दुरुस्ती कामाचं ई टेंडर काढण्यात आलं होतं, त्याला निधी मंजूर झाला, परंतु त्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांनी शौचालयाच्या दुरुस्तीऐवजी नव्याने शौचालय उभारणी करावी असं पत्र दिले, स्थानिक रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार याठिकाणी नव्याने शौचालय बांधण्यासाठी पुन्हा ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेतून जावं लागत आहे, त्यामुळे हा विलंब झाला असून लवकरच या कामाला गती येईल, परंतु काही लोकांना हाताशी धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विकासकामांमध्ये राजकारण करण्याचं काम करत आहे. खोटेनाटे आरोप लावून आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करते, हे योग्य नाही, याठिकाणी कामं कोणं करतं हे जनतेला माहिती आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena has taken notice of Shiv Sena leader and Environment Minister Aditya Thackeray, who has been blamed for development work in Worli constituency. Former MNS corporator Santosh Dhuri has accused Shiv Sena through Facebook Live. As the subject is directly related to Aditya Thackeray’s constituency, Shiv Sena corporator has also become aggressive.

News English Title: MNS party slams Shivsena over Worli constituency of minister Aaditya Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x