23 December 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडणार - जगदीश खांडेकर

MLA Amol Mitkari

मुंबई, २१ ऑगस्ट | महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. या टीकेवर मनसेनेही प्रत्युत्तर दिले. मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट धमकीच दिली आहे.

मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडणार (MNS party worker Jagdish Khandekar threatens NCP MLA Amol Mitkari) :

मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिली. खांडेकर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ टाकला आहे. महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आहे. तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय. हे गटार बंद ठेवा, अन्यथा मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं काम करतो तेथून मंत्रालयात गाडी घेऊन जाताना गाडीच्या काचा फोडू.

तुम्ही गाडीच्या काचा काळ्या करून जातात, आता जास्त काळ्या काचा करून जा. नाही तर दुसऱ्याची गाडी घेऊन या, नाही तर महाराष्ट्र सैनिकाला गाडीत दिसला तर फोडून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी मनसे नेते खांडेकर यांनी दिली. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करून राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केला; पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे. (MNS Jagdish Khandekar threatens NCP MLA Amol Mitkari)

एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचे काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झाला का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही, असेही खांडेकर म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS party worker Jagdish Khandekar threatens NCP MLA Amol Mitkari news updates.

हॅशटॅग्स

#AmolMitkari(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x