29 January 2025 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

मुंबई मनसेत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस | महत्वाची बैठक

MNS Chief Raj Thackeray,, Amit Thackeray

मुंबई, ०३ फेब्रुवारी: कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील मनपा वॉर्डची संपूर्ण जबाबदारी या समितीवर असणार आहे.

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले या बैठकीला उपस्थित होते.

 

News English Summary: After the two leaders from Kalyan Dombivali beat MNS, riots have started on ‘Krishnakunj’. A meeting of MNS leaders was held in the presence of MNS president Raj Thackeray. Important leaders including Amit Thackeray, Bala Nandgaonkar, Nitin Sardesai were present at the meeting. In Mumbai, MNS has formed a committee consisting of one Lok Sabha leader and one General Secretary.

News English Title: MNS president Raj Thackeray called urgent meeting before municipal corporation election news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x