अन्यथा सरकारचे आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु | राज ठाकरेंचा इशारा
मुंबई, ३ सप्टेंबर : सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी अपेक्षा आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
मंदिर हा भक्ती पुरता विषय नाही यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मॉल, सार्वजनिक कार्यक्रम यासाठी जसे निर्बंध आहेत तसे मंदिराबाबत ही असू द्या. सरकारने लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर सरकारच्या आदेशाना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल.
सरकारच्या डोळ्यावर गुंगीची झापड आल्याने त्यांना हिंदू भाविकांचा कंठशोष दिसत नसल्याची टीका राज ठाकरेंनी केलीय. मंदिर सुरु करणं हा विषय केवळ देवापुरता मर्यादीत नाही. याला जोडून देखील एक अर्थव्यवस्था असते. मंदिरात सेवा करणारे पुजारी, गुरव हे त्यावर अवंलंबून असतात. सर्वात शेवटी मंदिर उघडून सरकारने उगीच पुरोगामीत्व दाखवू नये. त्याआधीच नियमावली आखून हिंदुंच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा.
राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
“अनलॉक क्रमांक अमुक तमुक अशा अनलॉक प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे. आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरुच आहे, असं का ? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?,” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
“करोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्हीदेखील समर्थन केलं होतं. पण आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकी महाराष्ट्रात देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथील करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच गोष्ट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “लॉकडाउनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपळकाल्याचा उत्स्व असो की गणेशोत्सव असो..राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे. सरकारच्या आदेशाचं अत्यंत समजूतदारपणे पालन केलं आहे. उद्या मंदिर उघडली तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आह,” असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
News English Summary: The government should not open the temples at the end of all and show progress, but should make a rule and pave the way for Hindus to enter the temples. But still, if the government does not take positive steps in this regard as soon as possible, we will have to enter the temple in defiance of the government’s orders.
News English Title: MNS Raj Thackeray Letter To Maharashtra CM Uddhav Thackeray Over Temple Opening Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा