शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय - अविनाश जाधव

ठाणे, १६ ऑगस्ट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्र सैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांदरम्यान खटके उडताना दिसत आहेत आणि त्यातून निरनिराळ्या राजकीय टिपण्या सुद्धा दोन्ही बाजूने होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील राजकरणात अस्तित्वात असले तरी तोंड न उघडणारे खासदार देखील सध्या प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या अविनाश जाधव यांनी, ‘ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांनाही एक दिवस अशाचप्रकारे घरातून उचलून नेऊ’ असं विधान केल्याने शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मनसेला थेट आव्हान दिलं आहे. आम्ही पदावर असलो तरी शिवसेनेत आमचं एक पद आहे ते शिवसैनिक….त्यामुळे आमच्या नादी लागू नका असं खासदार राजन विचारे म्हटले होते. त्यावर अविनाश जाधव यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत अविनाश जाधव म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणं हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत, आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. मी म्हटलं होतं जे आम्हाला त्रास देतात ते..तुम्ही आम्हाला त्रास देतायेत का असा अर्थ होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल त्यांनी केला.
तसेच जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्रास देणाऱ्यांना असेच उचलून नेऊ हे विधान होते, कोणाला उचलून न्यायचं की नाही न्यायचं तर तो शिवसैनिक आहे. मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा आदर करतात. शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खासदार राजन विचारेंना दिला आहे.
दरम्यान, एरवी एकमेकांचं तोंडही न बघणारे ठाण्यातील शिवसेनेचे खासदार, आमदार, नामदार असे सगळे मनसेच्या अविनाश जाधव यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. कोविडविरोधातील उपाययोजना आखताना आणि अंमलबजावणी करताना या शिवसेना नेत्यांनी अशीच एकजूट दाखवली असती, तर कदाचित सर्वसामान्य नागरिक (वाढीव वीज बिल), करोनाबाधित रुग्ण (वैद्यकीय सुविधांचा अभाव), नर्सेस (कंत्राटी नोकरी) आणि कोकणातील चाकरमानी (एसटी) यांच्यासाठी मनसेला आक्रमक आंदोलनं करण्याची- उपक्रम आखण्याची गरजच भासली नसती. जाधव यांना शब्दांत पकडण्यापेक्षा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या धोरण आखणी आणि अंमलबजावणीतील चुका शतपटीने गंभीर आहेत, हे लक्षात ठेवा. ठाणे जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या सर्वाधिक का आणि कशी झाली, याचं आधी उत्तर द्या असा टोला मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी खासदार राजन विचारेंना लगावला आहे.
News English Summary: Shiv Sena MP Rajan Vichare has directly challenged MNS. Even though we are in office, we have a position in Shiv Sena. Therefore, MP Rajan Vichare had said don’t follow our advice. Avinash Jadhav has also replied to that.
News English Title: MNS Target to Rajan Vichare & Shiv Sena Avinash Jadhav Said Balasahebs ShivSainiks are respected News Latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON