22 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

संजय राऊत राष्ट्रपती होतील | तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल.....कोणी म्हटलं?

MP Sanjay Raut, President Rules, Maharashtra, Kunal Kamra

मुंबई, १८ ऑक्टोबर : कुणाल कामरा यांचा ‘Shut Up Ya Kunal’ कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात कामरा हे अनेक राजकीय नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना दिसतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा स्वतः कुणाल कामरा यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘Shut Up Ya Kunal’ च्या दुसऱ्या सीझनचे पहिले पाहुणे म्हणून येण्यासाठी संजय राऊत तयार झाले तरच मी हा कार्यक्रम सुरू करेन, अन्यथा नाही, असं कामरा यांनी या ट्वीट केलं होतं.

त्या ट्वीटला संजय राऊत यांनी प्रतिसाद दिल्यानंतर कुणाल कामरा यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. स्वतः संजय राऊत यांनी या भेटीचा फोटो ट्वीट केला होता. त्यामुळे कामरा यांच्यासोबत राऊत यांच्या अनौपचारिक गप्पामधून नेमकं काय साध्य होणार ते पहाव लागणार आहे.

दरम्यान, कॅामेडियन कुणाल कामराच्या ’शट अप कुणाल’ या शोसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतीचे चित्रिकरण नुकतेच झाले आहे.सतत चर्चेत असणाऱ्या कुणाल कामराने आता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट लावण्याच्या वादात उडी घेतली आहे. ‘शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रपती होतील, तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालणार आहे’ अशा शब्दांमध्ये ट्विट करत त्याने भाजपचा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आग्रही असणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. नेत्यां पासुन ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांना ही मागणी केली. मात्र याचसंदर्भात दिल्लीतील तीन व्यक्तींनी सुप्रिम कोर्टात केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अनेकांचं स्वप्न भंगल.त्याच पार्श्वभूमिवर कुणाल कामराने संजय राऊत राष्ट्रपती झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल असे चिमटे विरोधकांवर काढले आहेत.

 

News English Summary: An interview with Shiv Sena MP Sanjay Raut has recently been filmed for comedian Kunal Kamara’s show ‘Shut Up Kunal’. “When Shiv Sena leader Sanjay Raut becomes the President, I will have a presidential rule in Maharashtra,” he tweeted, referring to the BJP and those who are pushing for a presidential rule in Maharashtra.

News English Title: MP Sanjay Raut becomes president then I will like Presidential rule in Maharashtra says Kunal Kamra News updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x