16 April 2025 7:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी राऊत गुजरात दंगलीबद्दल बोलत आहेत - निलेश राणे

MP Sanjay Raut, Sushant Singh Rajput case, Godhra Kand, Former MP Nilesh Rane

मुंबई, ०९ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या तपासाबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. एवढंच ‘नाहीतर मुंबई पोलिसांमध्ये . बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली’ असा संशयही राऊतांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन भाजप, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न उपस्थितीत केले आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूआधी त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी. पण राजकीय पुढारी दोन आत्महत्यांचा धागा जुळवत आहेत. दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिला इमारतीवरून फेकले, असा आरोप भाजपाचे एक पुढारी करतात तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाचा थोडाही विचार केलेला दिसत नाही. दिशा सॅलियनच्या वडिलांनी एक पत्र लिहून याबाबत खंत व्यक्त केली. मृत्यूनंतर माझ्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी का करता, हा तिच्या माता-पित्यांचा सरळ प्रश्न आहे. दिशा सॅलियन हिचे संपूर्ण कुटुंबच या बदनामीमुळे मानसिकदृष्टय़ा खचले आहे. तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले असे आता समोर आले’ असंही संजय राऊत यांनी सांगितले.

गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांत सिंग राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?’ असा सवाल करत राऊतांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला. तसेच सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला, असं संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून टीका करताना संजय राऊत यांनी थेट गुजरात दंगलीचा देखील उल्लेख केल्याने माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यवर बोचरी टीका केली आहे. यावर ट्विट करताना निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “संजय राऊत कचरा आहे … छोट्या पेंग्विनला वाचवण्यासाठी ते आता गुजरात दंगलीबद्दल बोलू लागले आहेत. आता सुशांतच्या बाबतीत तुम्ही लक्ष विचलित करण्याचा कितीही प्रयत्न करा त्याचा काही काहीही फायदा होणार नाही,” असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Shivsena MP Sanjay Raut, the mouthpiece of the daily Saamana, the mouthpiece of the Shiv Sena, has raised some questions on the investigation of the BJP, Bihar Police and Mumbai Police.

News English Title: MP Sanjay Raut would like divert peoples from Sushant Singh Rajput case reason talking on Godhra Kand says Former MP Nilesh Rane News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या