18 November 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

उलट माझं कौतुक केलं पाहिजे | डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे

MP Shivsena Sanjay Raut, World Health Organization Doctors

मुंबई, १७ ऑगस्ट : ‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी अशी मागणी केली आहे. अखेर संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारून काढले आहे.

‘डॉक्टर मंडळी आपलीच आहेत. जेव्हा ते अडचणीत आलेत त्यावेळी मी व्यक्तीशा त्यांची मदत केली आहे. डॉक्टरांच्या विरोधात जेव्हा भरमसाठ बिलं आली म्हणून आंदोलनं केली त्यावेळी मीच मध्यस्तीची भूमिका केली आणि डॉक्टरांची बाजू घेतली होती. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही’ असं राऊत यांनी स्पष्ट केले.

‘एका विशिष्ट राजकीय विचारांची लोकं मोहीम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झाली. गैरसमज कुणी करू नये, माफी मागण्यास काही जण सांगत आहेत पण मी अपमानच कुणाचा केलेला नाही’ असंही राऊत यांनी ठामपणे सांगितले.

“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांना फटाकलं आहे. संबंधही तोडले आहेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. करोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले की, कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशा वेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच, पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरना जास्त कळते, असे म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. आयएमएच्या राज्यभरातील २१६ शाखांतर्फे राऊत यांच्या निषेधाचे ठराव मंजूर करून ते राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्यसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. भोंडवे यांनी म्हटले होते.

 

News English Summary: The medical fraternity demanded an unconditional apology from Shiv Sena leader Sanjay Raut in the wake of his “irresponsible” comments. Raut had blamed WHO for spread of coronavirus and said compounders know better than doctors.

News English Title: MP Shivsena Sanjay Raut On World Health Organization Doctors News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SanjayRaut(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x