22 December 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक, पवारांनी पाठिंबा जाहीर केला, काँग्रेसने उमेदवार न दिल्यास शिवसेनेचा विजय सोपा होणार?, आकडेवारी जाणून घ्या

Murji Patel

Mumbai Andheri East Assembly By Poll Election | शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेवरील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. इथे 3 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जाहीर झालेली ही पहिलीच चिन्हावरील निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईत आता शिवसेनेच्या चिन्हाचे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेणार याची चर्चा आहे. मात्र या चर्चेपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे सलीम मापखान यांचा सुद्धा एक मतदारवर्ग आहे, मात्र आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा मोठा मतदार वर्ग आहे. जर शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा जाहीर झाल्यास शिवसेना उमेदवाराचा मार्ग सोपा होऊ शकतो.

दुसरीकडे, येथे शिंदे गटाची राजकीय ताकद नाही आणि त्यांच्याकडे लढत देईल असा पदाधिकारी सुद्धा नाही. दुसरीकडे, एक गणित पाहिल्यास या मतदारसंघात गुजराती, जैन आणि मारवाडी असे ४०-४२ हजाराच्या आसपास मतदार आहेत. त्यामुळे २०१४ असो (भाजप-सेना स्वबळावर) किंवा २०१९ ची विधानसभा निवडणूक (युतीत) असो, भाजपच्या उमेदवारांना याच आसपासची मतं पडली आहेत. म्हणजे २०१४ मध्ये भाजपाला ४७३३८ मतं मिळाली होती, तर २०१९ मध्ये ४५,८०८ (भाजपचा बंडखोर उमेदवार) मतं पडली होती. मात्र इथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला कसं मतदान झालं होतं ते पाहिल्यास शिवसेनेचा मार्ग काहीसा सोपा होऊ शकतो. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला २०१४ मध्ये ३७, ९२९ मतं पडली होती, तर २०१९ मध्ये २७,९५१ मतं पडली होती.

Murji Patel

Murji Patel

मात्र भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आता पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आहे. कारण, अंधेरी पूर्वेतील अनेक एसआरए प्रकल्पातील घरांच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे मुरजी पटेल यांच्याविरोधात खूप चीड आहे. अनेक प्रकल्पांमधील एकच घरं अनेकांना विकलं गेल्याचा प्रकार घडला आहे आणि यामध्ये आकृती बिल्डरसबंधीत प्रकरणं याआधी सुद्धा पुढे आली आहेत. अनेक घरांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने घरं विकून पैसा लाटला गेल्याने मुरजी पटेल यांच्या कार्यालयात येऊन अनेकजण पैशाचा तगादा लावत असतात. अनेक प्रकरणात त्यांनी आपल्या परिचयातील लोकांना पुढे करून सौदे केले आणि प्रकरण अंगलट येताच त्याच्यावर जवाबदारी ढकलून मोकळे झाल्याने त्यांचाबद्दल रोष आहे. याच विभागातील मनसेच्या एका सरचिटणिसामार्फत मुरजी पटेल हे भाजपचे आशिष शेलार यांच्या संपर्कात आले होते. तिथून हा प्रवास सुरु झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Andheri East By Poll Election voting count check details 03 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x