22 January 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मुंबई | विकेंड लॉकडाऊन'मध्ये कसे असणार नियम? महापालिकेने दिली माहिती

Mumbai city,  weekend lockdown, guidelines, BMC

मुंबई, ९ एप्रिल: मुंबईतील सर्वात मोठ कोविड लसीकरण केंद्रही बंद झालं आहे. बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद झालं आहे. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करण्याची वेळ डॉक्टर आणि पोलिसांवर आली आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे लसीकरण सुरू असताना लॉकडाऊनचे नेमके नियम असतील, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र शहरातील वीकेंड लॉकडाऊनविषयी नवी माहिती आता समोर आली आहे.

मुंबईत आज रात्रीपर्यंत 1 लाख 88 हजार लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या आणि परवा वीकेंड लॉकडाऊन असला तरी लसीकरण सुरू राहील. नागरिकांना नोंदणीचा मेसेज दाखवून प्रवास करता येईल, अशी माहिती आहे.

मुंबई महापालिकेने कोव्हिडच्या सर्व उपाययोजना या जून महिन्यापर्यंत तयार ठेवल्या आहेत, असंही सांगण्यात येत आहे.

मुंबईत काय सुरू राहणार?

  • वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. पण वाहतुकीची साधने जसे रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरू राहतील
  • हॉटेलमधून होम डिलिवरी सुरू राहील
  • नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
  • अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यास मनाई

दरम्यान, 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला.

 

News English Summary: Restrictions imposed across the state to prevent the outbreak of corona include strict lockdown instructions from Friday night to Monday morning. On the one hand, there is confusion about the exact rules of lockdown when vaccinations are started. But new information about the weekend lockdown in the city has now come to light.

News English Title: Mumbai city week end lockdown guidelines issued by BMC news updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x