16 April 2025 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

काँग्रेसचा नारा माझी मुंबई, माझी काँग्रेस | मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार

Mumbai congress, BMC elections, Bhai Jagtap

मुंबई, २९ डिसेंबर: काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सोमवारी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिंरगा झेंडा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखवला. मुंबईत स्वबळावर लढण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असून, विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे, तिथे एक घाव दोन तुकडे करून जोरदार झटका दिला जाईल. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेतील ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान यावेळी आमदार भाई जगताप यांनी दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा जगताप यांनी स्वबळाचा सूर आळवला.

माझी मुंबई, माझी काँग्रेस’‌ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ, अशी प्रतिक्रिया मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकासआघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकासआघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे २२७ जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्या दिवशी सांगितला होता. काल पदभार स्विकारला तेव्हा पुनउल्लेख केला,” असेही ते म्हणाले.

 

News English Summary: On the occasion of the founding day of the Congress party, the new president of the Mumbai Congress Bhai Jagtap and working president Charan Singh Sapra on Monday called on the party’s in-charge H.P. K. He took over his post in the presence of Patil. At this time, all the Congress leaders, including Bhai Jagtap, expressed their determination to fly the tricolor flag of the Congress over the Mumbai Municipal Corporation in the forthcoming elections. In Mumbai, all the activists want to fight on their own.

News English Title: Mumbai congress will contest forthcoming BMC elections independently says Bhai Jagtap news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या