23 December 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

BMC पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता शिरीश दीक्षित यांचा कोरोनाने मृत्यू

Mumbai, BMC, Deputy Commissioner dies due to corona

मुंबई, ९ जून : राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मागील तीन महिन्यांपासून राज्यासह मुंबईमध्ये सुरू असलेला कोरोना विषाणूचा कहर अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. मात्र अशा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वाढत्या संक्रमाणामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी उपायुक्त शिरीश दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिरीश दीक्षित हे मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

News English Summary: Many government officials and employees are also at increased risk of coronary heart disease. Meanwhile, Mumbai Municipal Corporation in-charge High Commissioner Shirish Dixit has died in a shocking incident.

News English Title: Mumbai Corona virus shocking BMC Deputy Commissioner dies due to corona News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x