24 November 2024 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Mumbai Electricity OFF | आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार

Mumbai, electricity cut out

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर : मुंबईमधील काल (१२ ऑक्टोबर) खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे. २००० मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता, आता जवळपास सर्वच वीज पुरवठा सुरु झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी काल दुपारी दिली होती. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले.

दरम्यान केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार असून अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे असेही ते म्हणाले आहेत.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात काल सकाळी अचानक वीज गेली होती. बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागातही वीज नव्हती. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित झाला. मुंबईतील मोठ्या भागातील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेत पुन्हा असा प्रकार होता कामा नये, आणि योग्य त्या बाबी सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.

 

News English Summary: The power supply in Mumbai, which was cut off yesterday (October 12), has been largely restored. More than 2000 MW was cut off, now almost all the power supply has been restored. The rest of the supply will be restored as soon as possible, Union Energy and New and Renewable Energy Minister RK Singh said yesterday afternoon. He said the national grid was safe and some parts of the state grid were damaged. Meanwhile, a team of central officials led by the Central Electricity Authority (CEA) will visit Mumbai to find out the cause of such calamities and guide the state government on all possible measures, he said.

News English Title: Mumbai electricity cut out issue Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Mumba(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x