21 April 2025 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

मुंबईला PoK संबोधने, व्यक्ती व सरकारविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे | हायकोर्टाची कंगनाला समज

Mumbai High court, Kangana Ranaut

मुंबई, २७ नोव्हेंबर : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर  (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला आहे. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेनेच्या वाद अखेर मुंबई हायकोर्टात निकाली निघाला आहे. कंगनाच्या कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याची ठरवली आहे. तर दुसरीकडे कंगनालाही व्यक्ती आणि ठाकरे सरकारविरोधात टीका करण्यास बजावले आहे.

कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं तोडकाम केले होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली आहे.

‘मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे’ अशी शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिला आहे.

 

News English Summary: Shiv Sena’s case against Bollywood actress Kangana Ranaut has finally been settled in the Mumbai High Court. The High Court has ruled that the action taken by the Mumbai Municipal Corporation against Kangana’s office is illegal. On the other hand, Kangana has also been warned to criticize the individual and the Thackeray government. Kangana Ranaut’s office was demolished by Mumbai Municipal Corporation. The case was heard in the Mumbai High Court. Judge Shah Rukh Kathawala and Justice Riaz Chagla also spoke on the occasion.

News English Title: Mumbai High court waring to Kangana Ranaut over objectional statements against individuals and government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या