23 December 2024 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

१५ ऑगस्टपासून २ डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा | ऑनलाईन-ऑफलाईन पास मिळणार

CM Uddhav Thackeray

मुंबई ०८ ऑगस्ट | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला थोड्यावेळापूर्वीच संबोधित केलं. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा दर आणि मृत्यू दर कमी आहे, अशा जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आतापर्यंत राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लोकल ट्रेन सुरु करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

नीरज चोप्राने देशाची मान उंचावली:
ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी बजावली आहे. भारताने अनेक वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे नीरज चोप्रा यांचा अभिनंदन करायला हवं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही:
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक लोकांचा संसार उघडयावर आला असून यामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दौरा केला होता. दरम्यान, पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोणते संकेत दिले होते?
मुख्यमंत्री म्हणाले होते की, राज्य सरकार कोरोना निर्बंधात आणखी सूट देण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वसामान्य माणूस लवकरच यामधून प्रवास करु शकेल असा संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. ते ‘बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट’ (बेस्ट) च्या एका कार्यक्रमात बोलत होते.

शिथिलतेमुळे संसर्ग वाढू नये:
मुख्यमंत्री म्हणाले होते की, “महाराष्ट्र सरकार अधिक शिथिलता देण्यास तयार आहे. परंतु, आम्ही प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक घेत आहोत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांबाबतही निर्णय घेतला जाईल. या शिथिलतेमुळे कोरोना महामारीची इतर लाट येणार नाही हे आपल्याला सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते.”

राज्यात 25 जिल्ह्यांत शिथिलता:
राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यांत दुकाणे रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाच्या वर्गातील शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai local train travel will be permeated to citizens have took two covid dose of vaccine news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x