24 November 2024 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

२ डोस घेतलेल्या मुंबईकरांना ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार पास | अॅप विषयी देखील महापौरांची माहिती

Mumbai Mayor Kishori Pednekar

मुंबई, १० ऑगस्ट | सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. विरोधकांकडून यासाठी आंदोलन देखील केलं गेलं. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली.

परंतु, नेमकी प्रवासाची परवानगी कशी मिळेल, मुंबईकरांना पास कसा आणि कुठे मिळेल, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेलं मोबाईल अँप कधी सुरू होणार? याविषयी मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, येत्या २ दिवसांत मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी नोंदणीचं मोबाईल अॅप तयार केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईतील ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार पास:
राज्य सरकार आणि रेल्वे मिळून ही योजना केली जात आहे. मुंबईतल्या ६५ रेल्वे स्थानकांवर लोकांना क्यूआर कोड मिळणार आहे. २ दिवसांत त्या मोबाईल अॅपची निर्मिती केली जाईल. ३२ लाख प्रवाशांसाठी या अॅपची निर्मिती केली जात आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे”, असं महापौर म्हणाल्या.

रेल्वे स्थानकांवर तीन गोष्टी मिळणार:
दोन डोस घेऊन १५ दिवस उलटलेल्या मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर प्रवासाची परवानगी म्हणून तीन गोष्टी दिल्या जातील, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली. “सर्व ६५ रेल्वे स्थानकांवर सिस्टीमच्या माध्यमातून तिकीट, पास आणि क्यूआर कोड अशा तीन गोष्टी मिळतील. रांगा लागल्या तरी हरकत नाही. पण रांगा लावताना स्वत:ची काळजी घ्या. डबल मास्क लावा”, असं त्या म्हणाल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Mayor Kishori Pednekar clarification on Mumbai local travel permission after second dose mobile app news updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x