5 November 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

मुंबईत लस संपत आली तरी पुरवठा नाही | वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असं केंद्राचं धोरण - महापौर

Mumbai Mayor Kishori Pednekar, Modi govt, Corona vaccine

मुंबई, ७ एप्रिल: नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात ब्राझील आणि अमेरिका महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाच्या 55,469 नवीन केस आल्या. 34,256 बरे झाले आणि 297 जणांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांचा हा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 4 एप्रिलला 57,074 प्रकरणे आली होती.

देशात सर्वाधिक लसीकरण मुंबईसह महाराष्ट्रात सुरु असतानाच लसीचा साठा संपत आल्याची बातमी आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनीच हे वास्तव उघड केले आहे. त्यांनी संतापाने केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे, “सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ‘वरवर माया आणि पोटभर जेव ग बया’ असं केंद्र सरकारचं सुरू आहे. आम्ही जर लसीकरण करायचंय तर आम्हाला मिळायला तर पाहिजे ना.. आम्ही सगळे नियम पाळतो आहोत. राज्य सरकाराने केंद्राला पत्र ही पाठवलं तरी आम्हाला लस मिळत नाही”

राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात मुंबई देखील मागे नाही. मात्र, अशास्थितीत मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत पुढील २ ते ३ दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “मुंबईत सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे मिळून १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो”, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

 

News English Summary: While the highest number of vaccinations in the country has started in Mumbai and Maharashtra, it is reported that the stock of vaccines has been depleted. Mumbai Mayor Kishori Pednekar has revealed this fact. He has angrily targeted the BJP government at the Center, saying, “Sahyadri has always been treated unfairly by the Central Government.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar criticised Modi govt over supply corona vaccine news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x