23 December 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर

Mumbai Mayor Kishori Pednekar

मुंबई, ०६ मे : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुतीही केली आहे.

दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आलं आहे. यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावं. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायामूर्ती चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.

मुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगलं काम केलं आहे. अशावेळी दिल्लीने काही शिकलं पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने काम केलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले. चार अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही. लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही कोर्टाने सांगितलं.

दरम्यान, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी न्यालयालयाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर असल्याचं म्हटलं आहे. एवढ्या कठीण परिस्थतीत मुंबईकर अगदी संयमाने वागत आहेत आणि लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला, पण मुख्यमंत्री संयमी असल्याने सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Today, Mumbai Mayor Kishori Pednekar has commented on this issue while interacting with the media. This time, he has said that the real standard of appreciation given by the court is Mumbaikar. In such a difficult situation, Mumbaikars are behaving with restraint and attempts have been made to provoke the people, but Mayor Kishori Pednekar has said that the situation is under control as the Chief Minister is restrained.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar gave credit to Mumbaikar over appreciation of supreme court on corona pandemic handling in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x